स्थैय, फलटण दि.24 : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून फलटण येथील संगिनी फोरमने योगा प्रशिक्षिका स्मिता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.13 ते 21 जून या कालावधीत तब्बल 2,500 सुर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला. सदर उपक्रमात फलटण, मुंबई, लातुर, बारामती, सोलापुर, वेळापुर, अकलुज, सांगली येथील महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना स्मिता शहा यांनी योगा तसेच सुर्यनमस्काराचे महत्व विषद करुन कोरोना महामारीत सुर्य नमस्कारामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास खुप मदत होत असल्याचे नमूद केले.
दिपिका व्होरा यांनी मंगलाचरणाने सुरुवात केली. वृषाली गांधी यांनी स्मिता शहा याचां परिचय करुन दिला. संगिनि फोरम तर्फे स्मिता शहा यांचा अध्यक्षा संगिता दोशी, सचिव पोर्णिमा शहा, सहसचिव अपर्णा जैन यांनी सत्कार केला. निना कोठारी यांनी प्रास्ताविक केले. सचिव पोर्णिमा शहा यांनी सुञसंचालन केले. अलका पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सदर आरोग्यदायी उपक्रमाबद्दल संगिनी फोरमला सहभागी सर्व महिलांनी धन्यवाद दिले.