जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । सातारा । जागतिक एड्स दिनानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

या प्रसंगी डॉ. एस.एस. दहातोंडे, एस.एस. साळवे, दिवाणी न्यायाधीश, डॉ. रविंद्रनाथ चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा शल्यचकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल बडधे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एचआयव्ही या आजाराचे अजुनही समुळ उच्चाटन झालेले नाही. युवकांनी जबाबदार वर्तन अवगत करुन एचआयव्ही आजारापासून दूर रहावे, असे आवाहन करुन एचआयव्ही निर्मुलनामध्ये युवकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे यासाठी युवकांनी एकत्रीत येऊन एचआयव्ही विरोधी लढा दिला पाहिजे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!