गिरवीतील दारू धंदे बंद करण्याची महिलांची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२४ | फलटण |
गिरवी (ता. फलटण) गावातील दारू विक्री बंद करावी, अशा मागणीचे निवेदन फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना महिलांनी दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, गिरवीतील दारू विक्रीमुळे आमच्या घरातील भांडणाचे प्रमाण वाढत चालले आहे. काहीचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील दारू विक्रेता धनंजय विनायक निकाळजे व रामभाऊ भोसले हे आमचे हप्ते चालू आहेत, आमचे कोणीही काही करू शकत नाही, असे म्हणत आहेत. याची दखल घेऊन ही दारू विक्री बंद करावी, अशी आमची मागणी आहे.

हे निवेदन मनिषा अरविंद निकाळजे, वैशाली बापूराव निकाळजे व ज्योती महादेव निकाळजे यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!