‘वर्दीतील स्त्रीशक्ती’ : पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस दलातील स्त्री शक्तीचा सन्मान : नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव

स्थैर्य, मुंबई, दि. 23 : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.

महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

रेखा काळे

मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल रेखा काळे या प्रसूती रजेवर आपल्या गावी बेलवंडी, श्रीगोंदा येथे गेल्या होत्या. तिथे त्यांना प्राथमिक शाळेमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. काळे यांनी पतीच्या मदतीने क्वारंटाईन असलेल्या शाळेची साफसफाई केली आणि झाडांना पाणी घालून शाळेचा परिसर हिरवागार केला. हिरवा रंग हा निसर्गाशी, भूमीशी असलेले नाते दर्शवितो. काळे यांनी आपल्या या कार्यातून समृद्धीचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून काळे यांच्या अभिजात कार्याचा मला अभिमान आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!