स्थैर्य, नागपूर, दि.१३: नागपूरमध्ये एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून नवर्याचा खून केला आहे. महिलेचा नवरा तिच्या प्रेमसंबंधांच्या आड येत होता म्हणून तिने नवर्याचा काटाच काढला.
मिळालेल्या माहितीनुसार सरिता कनोजिया ही 38 वर्षीय महिला नागपूरमध्ये सोनेगावमधील जुनी वस्ती येथे राहत होती. तिचे पंकज कडू या 25 वर्षीय तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. सरिता शारदा नगर मध्ये आपल्या पतीसोबत राहत होती. सरिताचा नवरा शेखर कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय करत होता. नंत काही दिवसांनी शेकर पत्नी सरिताला सोडून आपल्या भावासोबत रहायला गेला. काही दिवसानंतर तो परत आला. पण तेव्हा सरिता आणि शेखरचे खटके उडायला लागले. शेकरला सरिता आणि पंकजच्य प्रेम प्रकरणाबद्दल कळाले. शेखरने सरिताला पंकजशी नाते तोडायला सांगितले. पण सरिता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तसेच यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.
अखेर दोघांनी मिळून शेखरचा काटा काढण्याचे ठरवले. सोमवारी स्काअळी दोघांनी मिळून धारदा शस्त्राने शेखरचा खून केला. शेकरचा अपघाती मृत्यू झाल्याचा दोघांनी बनाव केला आणि घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ दोघांनापकडून अटक केली.