विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । विजेचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी खोडद(ता.सातारा) येथे घडली.बबई बाबुराव राऊत (वय.62) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबई राऊत या खोडद येथे भाचा दीपक किसन दळवी यांच्या घरी राहत होत्या.गुरुवारी सकाळी घरात पाणी भरण्यासाठी त्यानी विद्युत मोटर लावली होती.पाणी भरल्यानंतर बबई राऊत या विद्युत मोटर बंद करण्यासाठी गेल्या असता त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला.यावेळी कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.या घटनेची फिर्याद भाचा दीपक दळवी यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास हवालदार प्रवीण शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!