
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनिषा संतोष पवार (वय 37) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ही घटना बुधवार, दि. 10 रोजी दुपारी साडेतीन ते गुरुवार, दि. 11 रोजी सकाळी साडेआठ या वेळेत घडली असल्याची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबतची अधिक माहिती अशी की, मनिषा पवार या गुजरवाडी येथील एका विहिरीत पडून मृत्यूमुखी पडल्या. याबाबतची खबर संतोष मच्छिंद्र पवार (वय 43, रा. गुजरवाडी) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे.
