दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील गोडोली येथून मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१४ मे रोजी सकाळी आठ ते पाच वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील राहत्या घरातून सौ. रीना शेखर किर्ते वय ४० या मुलगी महिमा शेखर किर्ते वय ७ मूळ रा. आरे – दरे, ता. सातारा या कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेल्या त्या अद्याप परत न आल्याची तक्रार शेखर शंकर किर्ते यांनी दिली.