
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सुरवडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत ३० ऑगस्टच्य रात्री पाण्याच्या टाकीवर पाणी भरण्यासाठी गेले असताना चुलत बहीण व अन्य एकाने ‘तू आमचा कामगार रवी राठोड यास घरातून हाकलून का लावले’, असे म्हणून चाकू, लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून जखमी केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याची फिर्याद सखुबाई रमेश चव्हाण (वय २८, रा. सुरवडी, ता. फलटण) यांनी पोलिसात दिली आहे.
कविता पिंटू चव्हाण व अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही, दोघेही रा. सुरवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवालदार पिसे करत आहेत.