स्थैर्य, अहमदनगर, दि.२५: इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुनावणी होण्याआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे. या प्रकरणाची संगमनेर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी वकील कोल्हे यांनी हा खटला लढविण्यास असमर्थता दाखविली आहे, अशी माहिती अंनिसच्या अॅड. रंजना गावंदे यांनी दिली माहिती.
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचे कामकाज आज होणार होते. मात्र या खटल्यात काम पहाणा-या सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकीलपत्र मागे घेतले आहे. इंदुरोकरांचे वकील के. डी. धुमाळ हे सरकारी वकिलांच्या भावाची ही एक केस चालवत असल्याने त्यांनी या इंदोरीकरांच्या खटल्याचे वकील पत्र सोडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सरकारी वकीलांनी वेळीच विचार करुन निर्णय घेणे गरजेचे होते. आता या खटल्यात नविन वकिलांची नेमणूक होऊन खटला जलद गतीने चालवण्यात यावा, अशी मागणी इंदोरीकर खटल्यातील तक्रारदार रंजना गवांदे यांनी केली आहे.
ग्राहक प्रबोधन समितीच्या पाठपुराव्यानंतर वाघमोडेदरा येथील रस्ता दुरुस्त