स्थैर्य, लोणंद, दि.२६: लोणंद मधील कचर्यातून भंगार गोळा करित उदरनिर्वाह करीत असलेल्या श्रीमती.शालन सुभाष जाधव वय 50 वर्षे यांना सुमारे एक वर्षांपासून दिसने बंद झाले होते यातच लोखंडी तारेने डोळ्यांना दुखापत झाली होती, त्यांना एक मुलगा आहे कु. संतोष जाधव हा किरकोळ आचारी काम करतो, श्रीमंत सईबाई सोसायटी जवळच कृषि उत्पन्न बाजार समितीचे गेट लगत सरकारी जागेवर एक पत्र्याचे शेड मध्ये हे छोटे कुटुंब राहते.
लोणंद शहरातील बसस्थानक परिसरात कचर्यातून भंगार गोळा करताना काही शालेय विद्यार्थी व युवक त्यांना चिडवुन द्यायचे तेव्हा अक्षरशः दगड घेऊन विद्यार्थी व युवकांचे पाठीमागे त्या धावायच्या यामुळे लोणंद च्या नागरिकांना माहिती /परिचित आहेत.
अंदाजे एक वर्षांचे आसपास श्रीमती शालन जाधव यांना भंगार गोळा करताना हळूहळू दिसायचे कमी होत गेले अत्यंत हालाकीची परिस्थिती असल्याने उदरनिर्वाह करणे जिकिरीचे होत असताना डोळ्यांवर औषधोपचार करने अवघडच असल्याने ते घरातच बसून राहायला लागल्या .
यातच कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन परिस्थिती समोर उभी राहिली यातुन आर्थिक संकटाला सामोरे जात असताना पुन्हा कधीच आपली लोकं व मुलगा दिसणार नाही व दैनंदिन जीवनातील घडामोडी हालाकित काढायला लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली असताना याबाबतची माहिती साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांना समजली त्यांनी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत सर यांचेशी संपर्क साधला व श्रीमती शालन जाधव यांच्या डोळ्यांची तपासणी केली, बाहेरून काही चाचण्या करायला सांगितल्या सदर पुर्वचाचण्या करण्यात आल्या त्या प्रमाणे आलेल्या रिपोर्ट नुसार सदर ऑपरेशन करणे गरजेचे होते व ते खुपच कठीण व खर्चिक होते, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला व श्रीयुत नागराज चव्हाण यांनी डॉ. देवदत्त राऊत यांना समक्ष भेटीद्वारे सदर ऑपरेशन दरात सवलत मिळावी अशी विनंती केली त्याप्रमाणे विनंतीचा मान ठेवून त्यांनी ती मान्य केली व काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले ती संपुर्ण रक्कम साथ प्रतिष्ठाण वतीने लगेच आदा करण्यात आली व सदर ऑपरेशन तातडीने होऊन यशस्वी झाले, काही वेळाने डोळ्यांची पट्ट्या काढण्यात आल्या तेव्हा त्यांना विचारले गेले समोर कोण आहे तेव्हा साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांकडे पाहत माझा भैय्या आहे तसेच शेजारी मुलगा आहे असं सांगताच केलेल्या कार्याचे समाधान वाटले, श्रीमती शालन जाधव यांना डोळ्यांनी दिसु लागलेने चेहर्यावर मोठा आनंद दिसुन येत होता त्यांस जगण्याची उमेद मिळाली होती.
याकामी सुलोचना नेत्रालय लोणंद डॉ. देवदत्त राऊत, श्रीयुत नागराज चव्हाण, जावेद पटेल यांचे सहकार्य लाभले, साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, दिपक जाधव,प्रतिक क्षीरसागर, सुनील जगताप आदींनी परिश्रम घेतले.