ना. अजितदादा व श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वात कार्यरत राहणार : डी. के. पवार


दैनिक स्थैर्य | दि. 16 मार्च 2024 | फलटण | उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आम्ही कार्यरत राहणार आहे; असे मत महानंदचे माजी उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी व्यक्त केले.

काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत डी. के. पवार यांनी आपले भूमिका स्पष्ट केले.

यावेळी बोलताना डी. के. पवार म्हणाले की; राज्यामध्ये कार्यरत असताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही कामकाज करीत आहोत. फलटण तालुक्यात कार्यरत असताना विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे. फलटण तालुक्यासाठी श्रीमंत रामराजे जो निर्णय घेतील तोच आमचा सुद्धा निर्णय असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!