दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्ह्याला गौरवशाली व वैभवशाली अशी परंपरा आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्यामध्ये काम करण्याच्या मिळालेल्या संधीतून जिल्ह्याच्या परंपरेला साजेसेच काम आपण करू, अशी ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांनी दिली.
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे दैनिक स्थैर्यच्या वतीने सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांचा यथोचित सत्कार करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी कोकरे बोलत होते. यावेळी दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे व दैनिक सकाळचे फलटण प्रतिनिधी किरण बोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियामध्ये काम करणार्या सर्व पत्रकारांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये काम करणार आहे. सातारा जिल्ह्यामधील सर्व पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य केले जाईल, असेही जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांनी यावेळी सांगितले.
प्रसन्न रुद्रभटे यांनी दैनिक स्थैर्य व साप्ताहिक स्थैर्य एक्सप्रेसच्या कामकाजाची सविस्तर माहिती जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांना दिल्यानंतर ‘स्थैर्य’च्या वृत्तसेवेचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांनी फलटण येथे सुरु असलेल्या कै. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालयाच्या कामकाजाची माहिती दिली.