स्थैर्य, नगर, दि. 20 : कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का? असा सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही असा आरोपही त्यांनी केला.
भाजपतर्फे ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आलं. परप्रांतीय कामगारांसाठी उपाययोजना नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.