कोणत्याही पेशंटची गैरसोय होऊ देणार नाही : अधिष्ठाता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर दि. 6 : कोविड-नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिव्हिल हौस्पिटल आणि सर्व डॉक्टर, कर्मचारी सज्ज आहेत. कोणत्याही रुग्णाची गैरसोय  होऊ देणार  नाही, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी आज स्पष्ट केले.  पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार योग्य कार्यवाही सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की सिव्हील हॉस्पिटल मध्ये अडीच ते तीन महिन्यापूर्वी कोविड वॉर्ड तयार केलेला आहे.  त्यामध्ये 115 बेडची सोय आहे. त्यामध्ये पंधरा बेड आयसीयुचे होते.  त्याची क्षमता  50 पर्यंत वाढवली  आहे.  बेड अपुरे पडत असतील तर त्यासंदर्भात डॅशबोर्ड तयार केला आहे.  कोणत्याही पेशंटला दाखल करून घेण्यासाठी  दिरंगाई होऊ देणार नाही. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार  खासगी दवाखान्यांचीही मदत घेत आहे. काही रुग्णांना खासगी दवाखान्यात दाखल केले जात आहे. त्यामुळे रुग्णांवर अतिशय व्यवस्थितरित्या उपचार सुरु आहेत. सोलापूरकरांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जाऊ नये. स्वतची काळजी घ्यावी. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!