
दैनिक स्थैर्य | दि. १३ मे २०२५ । फलटण । राजे गटाचे उरले सुरले नगरसेवक हे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या फलटण शहरात पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे.
आज एका लग्न समारंभात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजे गटाच्या उरल्या सुरल्या नगरसेवकांच्या सोबत मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातून शेक हैंड करत आगामी वाटचालीत सोबत जाण्याचा इशारा तर दिला नाही ना ?, अश्या चर्चा आता फलटण शहरात सुरू झाल्या आहेत.
फलटण शहरात राजे गट शिल्लक राहणार का ?
विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची फलटण नगरपालिकेवर सन १९९१ पासून सत्ता होती. आता प्रशासक असल्याने आगामी नगरपालिकेत निवडणुकीत मिलिंद नेवसे यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता ह्या घटनेने सुरू झाल्या आहेत.