सासवडमध्ये राजे गटाला धक्का

युवा नेते नंदकुमार झणझणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । फलटण । राजे गटाचे कट्टर समर्थक, वाघेशेरी डेअरीचे संस्थापक व शिवनदन पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार झणझणे यांनी त्यांच्या समर्थकांस आज माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, संतकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सासवड भाजपचे नेते राजेंद्र काकडे, मंडल अध्यक्ष बापुराव शिंदे, अमित रणवरे, किरण जाधव, विक्रांत झणझणे, सतीश झणझणे, माजी सरपंच देवराम झणझणे, पांडुरंग आनपट आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी खासदार रणजितसिह म्हणाले,की, तालुक्याचे विकासासाठी जनतेत परिवर्तन झाले आहे. यापुढे सासवड गावाला निधी कमी पडून देणार नाही. या भागाचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यामुळे जनतेने चिंता करायचे नाही. नंदकुमार झणझणे यांना तालुका पातळीवर काम तर करण्याची संधी देण्यात येईल. आमचे जुने सहकारी राजेंद्र काकडे हे सर्वांना बरोबर घेऊन चांगले काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात सासवड ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button
Don`t copy text!