दैनिक स्थैर्य । दि. २९ जून 2021 । फलटण । फलटण तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रचंड प्रेम केले आहे. त्या ऋणातून मुक्त होता येणार नाही परंतु या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करतच राहणार आहोत. आपण टाकलेला खासदारकीचा विश्वास या विश्वासाला पात्र होण्यासाठी पुढेही नक्कीच काम करत राहीन; अशी ग्वाही माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील नांदल, फरांदवाडी, सांगवी याठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोकराव जाधव, भाजपा फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, नगरसेवक सचिन अहिवळे उद्योजक हनुमंतराव मोहिते, पंचायत समिती सदस्या लताताई कोळेकर, पै. बाळासाहेब काशीद, युवा मोर्चाचे अध्यक्ष नानासाहेब इवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे,अमित रणवरे आदी उपस्थित होते.
खासदार रणजितसिंह पुढे म्हणाले, ‘‘या तालुक्यामध्ये खासदार झाल्यानंतर विविध कामे मंजूर करून घेतली. त्यामध्ये नीरा-देवघर, फलटण पुणे रेल्वेचा, नाईकबोमवाडी एमआयडीसी, सीतामाई घाटाचा प्रश्न, धर्मपुरी ते लोणंद पर्यंतच्या कामासाठी लागणारा निधी तसेच शेतकर्यांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना निधी, फलटण आदर्की रस्ता मंजूरी, फलटण ते शिंगणापूर व्हाया शेनवडी मार्ग असेल अशा अनेक कामांसाठी राज्य शासनाकडून व केंद्र शासनाकडून या तालुक्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे. तसेच जनसुविधा, नागरी सुविधा, खासदार फंड, व्यायाम शाळा, अंगणवाड्या व इतर सगळ्या गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या तालुक्याचा गेली वीस पंचवीस वर्षे थांबलेला विकास; सुरू करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. याही पुढे या तालुक्यातले अनेक उर्वरित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल’’.
यावेळी 2 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला नांदल ते सातारा रस्ता, खासदार फंडातून हायमास्क दिवे, फरांदवाडी येथे 10 लाख रुपये निधीतून रोड लाईट व अंतर्गत रस्ते, सांगवी येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष मॉडेल मधून 10 लाख रुपये निधीतून बस स्टॉप व हाय मॅक्स दिवे आदी विकास कामांचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सरडे येथील टोकियो ऑलम्पिकमध्ये निवड झालेल्या प्रवीण जाधव यांच्या कुटूंबाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घरी जाऊन सत्कार केला. तसेच गावातील इतर राज्यपातळीवर विविध खेळांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचाही सत्कार यानिमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
यावेळी पत्रकार शत्रुघ्न जाधव, युवा नेते तुकाराम शिंदे, रामदास शेडगे, कांचाभाऊ धायगुडे, नाना मोहिते, प्रदीप मोहिते, अमोल निकम, अनिल कोळेकर, दादा कोकरे, रोहिदास कोळेकर, बुवा कोळेकर, संदीप सुळ , बबन भगत, युवा नेते सचिन भिलारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.