माजी खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी कायम राहणार : मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 28 ऑगस्ट 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभेमध्ये जरी पराभव झाला असला तरी त्यांच्या पाठीशी फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता आहे. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व मी सुद्धा खंबीरपणे कायम पाठीशी उभा राहणार असल्याचे मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे फलटण दौऱ्यावर असताना त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने संपन्न झाला; त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री ना. पाटील म्हणाले की; नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीला भरीव असे मताधिक्य मिळालेले आहे. या मताधिक्याचा विचार करता आगामी काळात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांची पुढील दिशा ठरवली जाईल. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना त्यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक रखडलेली विकास कामे मार्गी लावलेली आहेत. त्यामुळेच फलटणची जनता त्यांच्यासोबत आलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!