
स्थैर्य, फलटण, दि. १२ : विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतीच कोरोना प्रतिबंधक कोव्हीशील्ड लस घेतली. लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढत आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तरी नागरिकांनी कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे. विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा नियोजित फलटण व सातारा दौरा कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे रद्द करण्यात आलेला आहे. पुढील आठवड्यामध्ये विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे फलटण व सातारा येथे येणार आहेत, अशी माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटसद्वारे दिली.