स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आयपीओमध्ये गुंतवणूक करताना या ५ महत्त्वाच्या घटकांकडे द्या लक्ष

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 12, 2021
in संपादकीय

स्थैर्य, मुंबई,दि. १२: २०२० मध्ये लॉन्च झालेल्या १५ मुख्य आयपीओंपैकी १४ कंपन्यांचे स्टॉक्स त्यांच्या इश्यू प्राइसपेक्षा जास्त किंमतीवर व्यापार करत आहेत. अनेक शेअर्सचे रिटर्न्स २००% किंवा ४००% पेक्षा जास्त आहेत. ११ शेअर्सनी लिस्टिंगच्या दिवसापासूनच नफा द्यायला सुरुवात केली तर ६ स्टॉक्स दिवसाला ७०% पेक्षा जास्त रिटर्न्स देत आहेत.

असे असले तरीही आयपीओतील गुंतवणूक एवढी सोपी गोष्ट नाही. आपला आयपीओ उत्पन्न देण्याऐवजी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर असला पाहिजे, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आयपीओमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या महत्वपूर्ण घटक लक्षात घ्यावेत याबद्दल सांगत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

१. बारकाईने संशोधन करा: आयपीओ म्हणजे एखादी विशिष्ट कंपनी पहिल्यांदा एक्सचेंजच्या यादीत समाविष्ट होत असते. लिस्टिंग झाल्यानंतर कंपन्यांना तिमाही तत्त्वावर त्यांच्या महत्त्वपूर्ण वित्तीय आकडेवारीचा अहवाल देणे बंधनकारक असते. दरम्यान, कंपनी सार्वजनिक होण्यापूर्वी ही माहिती सहजपणे उपलब्ध होत नसते. कंपनीची सर्व संबंधित आकडेवारी डीआरएचपी किंवा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये असावी लागते. फक्त हे लक्षात घ्यावे की, हे ड्राफ्ट कंपन्यांनीच तयार केलेले असतात, निधी कमावणे, हाच त्यांचा उद्देश असतो. केवळ बाजाराच्या नि:पक्षपाती घटकांवर हे काम आधारलेले नसते.

म्हणूनच, तुम्ही संपूर्ण संशोधन करून कंपनी, त्यांचे प्रमोटर्स, क्रिमिनल रेकॉर्ड्स (असेल तर), वित्तपुरवठा, प्रतिस्पर्धी, माध्यमांतील बातम्या आणि कंपनीचे क्षेत्र किती प्रगती करत आहे, याबद्दल आपण माहिती मिळवली पाहिजे. इतर शब्दात सांगायचे म्हणजे, आयपीओमध्ये चांगला परतावा मिळवायचा असेल तर शक्य तेवढा सखोल अभ्यास केला पाहिजे.

२. मूल्यांकनावर लक्ष द्या: अलॉटमेंट मिळवण्याच्या घाईत असे दिसून येते की, अनेक गुंतवणुकदार कंपनीच्या मूल्यांकनाकडे किंवा फंडामेंटल अॅनलेसिसकडे लक्षच देत नाहीत. डीआरएचपीमध्ये जी माहिती दिलेली असते, त्यानंतरही एखादी व्यक्ती सार्वजनिक होताना फंडामेंटल अॅनलेसिस करण्यासाठी फार घटक दिसून येत नाहीत. सार्वजनिक होणाऱ्या कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांकडून समृद्ध मूल्यांकनाची मागणी करणारे स्टॉक ऑफर करतात. याबद्दल अचूक कल्पना येण्यासाठी आपण नेहमीच त्याचे प्रतिस्पर्धी किंवा संबंधित क्षेत्रातील ट्रेंड समजून घेतला पाहिजे. सार्वजनिक होणारी कंपनी अशा क्षेत्रातील पहिलीच कंपनी असेल तर स्पर्धकांनुसार तिचे विश्लेषण करणे आणखी कठीण होते.

३. क्यूआयबीचा सहभाग महत्त्वाचा: कोणतीही सार्वजनिक होणारी कंपनी क्यूआयबीचा किंवा क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल खरेरीदारांसाठी विशेष व्यवस्था करते. क्यूआयबी हे सेबी नोंदणीकृत वित्तीय संस्था, बँका, म्युच्युअल फंड्स आणि एफआयआय (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) असतात, जे इतरांच्या मार्फत पैसा गुंतवत असतात. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, स्टॉकचा अंदाज घेण्यासाठी समर्पित नेटवर्क असल्यामुळे क्यूआयबीचा सहभाग हादेखील स्टॉकचा भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठीचा चांगला धागा ठरू शकतो.

तरीही, क्यूआयबीना देखील पूर्वग्रह असल्यामुळे केवळ त्यांच्यावरच विसंबून राहू नये. उदा. मागील वर्षी लिस्टेड झालेल्या कंपन्यांपैकी फक्त एक स्टॉक त्याच्या इश्यु प्राइसपेक्षा कमी किंमतीत व्यापार करत आहेत. क्यूआयबीकडून याला १० पटींनी ओव्हर सबक्रिप्शन मिळाले होते. या ओव्हर सबक्रिप्शनमुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी परताव्याची हमी वाटली असेल तर, कदाचित काही दिवसानंतरही तुम्हाला याचे परिणाम दिसू शकतात.

४. डीआरएचपी पूर्णपणे वाचा: सार्वजनिक होणाऱ्या कंपन्यांना त्यांचे व्यावसायिक कामकाज, महसूल, मालमत्ता, उत्तरदायित्व, बाजाराचा लँडस्केप आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार वाढीव निधीचा ते कशाप्रकारे वापर करणार आहेत, या सर्वांबाबत तपशीलवार माहिती देणे बंधनकारक असते.

गुंतवणूकदारांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाते, जेणेकरून ते माहितीपूर्ण निर्णय घेतील. आरएचपीमधयेही पक्षपातीपणा होत असला तरीही तुम्ही बारकाईने अभ्यास करत असाल तर यातूनही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज येऊ शकते. कंपनीची पूर्वीची कामगिरी आणि निधीचा वापर कसा केला, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या निधीचा वापर संशोधन किंवा व्यवसाय वृद्धी दर्शवला असेल तर हे चांगले संकेत असून भविष्यात कंपनीची वृद्धी होऊ शकते. मात्र निधी उभारणी या कंपनीचे उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी असेल तर कंपनीची बॅलेन्स शीट आणि नफ्याबद्दल तपशीलवार विश्लेषण करणे आवश्यक आहे.

५. तंत्रज्ञानाचा लाभ घ्या: आयपीओमध्ये असलेली प्रचंड गतिमानता पाहता, त्याचे सखोल विश्लेषणदेखील केले पाहिजे. आपण चुकांसह किंवा वरवर विश्लेषण करण्यापेक्षा यातील तज्ञ व्यक्ती हे काम करत असेल तर त्यालाच प्राधान्य द्यावे. सध्याच्या घडीला, भारतात गुंतवणुकीची शिफारस करणारे अनेक इंजिन्स आहेत, जे १ अब्जापेक्षा जास्त डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करून बेंचमार्कवरील निर्णायक निकाल दर्शवतात. ते आयपीओ केंद्रित सल्लादेखील देतात, हीदेखील चांगली बातमी आहे. त्यावरून तुम्ही कोणत्या आयपीओमध्ये सहभाग घ्यावा आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे हे कळते.

आयपीओ जेवढे फायदेशीर असतात, तेवढीच त्यात जोखीमही असते. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. त्यामुळे उपरोक्त घटक लक्षात ठेवावेत. त्यामुळे काही अलॉटमेंट मिळवण्यासाठी आयपीओ ही नेहमीच लाभकारक संधी ठरू शकते.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

पुढील आठवड्यामध्ये फलटण व सातारा येथे येणार : श्रीमंत रामराजे; विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे यांनी घेतली कोरोनावरची लस

Next Post

प्रभाकर शिंदे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली

Next Post

प्रभाकर शिंदे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.