गुरू कमोडिटिजचा गुरू कोण ? उदयनराजे यांचा अजित पवारांवर पुन्हा निशाणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | ज्यांनी सहकार खाजगीकरणाच्या नावाखाली मोडीत काढला ते पुन्हा सहकाराची भाषा करता . जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिल्यानेच जिल्हा बँकेच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला त्यामुळे जरंडेश्वरच्या गुरूलाच याच जाब विचारायला हवा त्यासाठी हा गुरू कोण ? हे समोर यावे असा घणाघात खासदार उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाव न घेता केला .

जिल्हा बँकेत अर्ज भरल्यानंतर सोमवारी मौनव्रत धारण केलेल्या उदयनराजे यांनी आज शासकीय विश्रामगृहात पुन्हा आक्रमकपणे तोफ डागली .

उदयनराजे पुढे म्हणाले सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मालकीची आहे . ही बँक व्यक्तिगत कोणाची जहागिरी नाही . दबाव टाकून बँकेत येणाऱ्यातला मी नाही. लोकांनी त्यांच्या पैश्याची देखरेख करण्यासाठी मला बँकेत पाठवलं आहे अशी मखलाशी त्यांनी केली .

मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार का केला नाही? जरंडेश्वर कारखाना गुरू कमोडिटीच्या ताब्यात आहे, मात्र याचा गुरू कामोडीटीचा गुरू कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

कारखाना कुणाच्या मालकीचा आहे, असा सवाल उपस्थित करत उदयनराजे यांनी पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या ते पुन्हा सहकारात कसे काय? ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीत काढल्या त्यांनी 10 तारखेच्या आत फॉर्म माघारी घ्यावेत. माझी पण माघार असेल, असे सांगत आमदार शिवेंद्रराजे यांच्या मोडकळीत आलेल्या अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेवर निशाण साधत शिवेंद्रराजेंवर नाव न घेता टोला लगावला.


Back to top button
Don`t copy text!