
स्थैर्य,मुंबई, दि.२०: तुम्ही नवीन मोबाईल घेतला आणि कोणतं सीम घ्यावं? असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याशिवाय तुमच्या सध्याच्या मोबाईलमध्ये ज्या कंपनीचं सीम आहे त्या सीमला चांगलं नेटवर्क मिळत नसेल, तुम्ही दुसरं सीम घेण्याच्या तयारीत असाल आणि कोणत्या कंपनीचं सीम घ्यावं असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत.
रिलायन्स जिओवर वोडाफोन आणि आयडियाची बाजी
सध्या देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी जिओने मार्केटमध्ये येऊन एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाला मोठा झटका दिला. मात्र, आता वोडाफोन आणि आयडियाने एकत्र येऊन जिओ आणि एअरटेलला मोठा झटका दिला आहे. कॉल क्वॉलिटीच्या बाबतीत वोडाफोन आणि आयडियाने बाजी मारली आहे. याबाबत स्वत: टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया माहिती दिली आहे.
BSNL कंपनीचे सर्वाधिक कॉल ड्रॉप
जानेवारी 2021 मध्ये वोडाफोन-आयडियाचे कॉलड्रॉप 4.46 टक्के होती. यामध्ये आयडियाचे कॉल ड्रॉप 3.66 टक्के होते. दुसरीकडे रिलायन्य जिओचे कॉल ड्रॉप 7.17 टक्के आणि एअरटेलचे कॉल ड्रॉप 6.96 टक्के होते. तर BSNL चे कॉल ड्रॉप सर्वाधिक 11.55 टक्के असल्याचं ट्रायच्या निरीक्षणात समोर आलं आहे. ग्राहकांची मतं घेऊनच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
कॉल क्वॉलिटीच्याबाबतीत आयडिया सर्वात बेस्ट
जानेवारी 2021 च्या आकडेवारीनुसार आयडिया व्हाईस कॉल क्वॉलिटीसाठी सर्वात बेस्ट असल्याचं समोर आलं आहे. कारण आयडिला याबाबतीत 5 पैकी 4.8 गुण मिळाले आहेत. तर वोडाफोनला 5 पैकी 4.2 गुण मिळाले आहेत. दुसरीकडे रिलायन्स जिओ आणि एअरटेल दोघी कंपन्यांना 3.9 गुण मिळाले आहेत. तर BSNL कंपनीला 3.8 गुण मिळाले आहेत.
इनडोअर कॉलमध्येही वोडाफोन-आयडियाची बाजी
वोडाफोन-आयडियाला इनडोअर कॉल क्वॉलिटीसाठी 4.2 गुण मिळाले आहेत. तर आउटडोअर कॉलसाठीसाठी 4.1 गुण मिळाले आहेत. दुसरीकडे रिलायन्स जिओला इनडोअरसाठी 4.0 तर आउटडोअरसाठी 3.7 गुण मिळाले आहेत. त्याचबरोबर एअरटेअलला इनडोअर आणि आउटडोअर कॉलसाठी 3.9 गुण देण्यात आले आहेत