जिथं जातात, तिथं खोटं बोलतात! राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, हिसुआ, दि.२३: राहुल गांधी यांनी
चीन सीमावाद व रोजगाराच्या मुद्यावरून मोदींना सवाल करत बिहारच्या जनतेला
सत्तांतराचं आवाहन केलं. राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त संकल्प
रॅली नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी
पंतप्रधान मोदींवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी
म्हणाले,‘बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक
होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतोय. प्रश्न नतमस्तक होण्याचा
नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले,
हा प्रश्न आहे. लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर
प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत
येत नाहीत,’ असं राहुल गांधी म्हणाले.

‘प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी
आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीननं घेतली. चिनी सैन्य
भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले
होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण,
खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी
हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू
नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली. मागील निवडणुकीत म्हणाले
होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात,
शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व
अदानीचं काम करतात. तुमच्यासमोर डोकं ठेवणार आणि काम दुस-याचं करतात. भाषण
तुम्हाला देणार, पण काम करायची वेळ आली की, दुस-याचं करणार. नोटबंदी केली.
आपल्याला फायदा झाला का? तुमचा पैसा घेतला आणि भांडवलदारांचं कर्ज माफ
केलं. आता तीन कृषी कायदे केले आहेत. संपूर्ण देशात बाजार समिती व्यवस्था
संपवणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार करणार आहेत आणि जिथेही जातात, तिथे
खोटं बोलतात. भारताची जमीन कुणीही घेतली नाही. लाखो लोकांना रोजगार दिला.
शेतक-यांसोबत उभा आहे. पण, काम फक्त दोन लोकांचं करतात,’ अशी टीका राहुल
गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

कोरोना, बेरोजगारीच्या खोट्या आकड्यांनी संपूर्ण देश त्रस्त

‘कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या
आकड्यांनी पूर्ण देश त्रस्त’ असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं
आहे. बिहार दौ-यापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट
केले आहे. ‘तुम्हारे दावों में बिहार का मौसम गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे
हैं ये दावा किताबी है! कोरोना असो वा बेरोजगारी, खोट्या आकड्यांनी पूर्ण
देश त्रस्त, आज बिहारमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. या आणि या
खोट्यापासून तुमची सुटका करा’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!