क्षयरोग म्हणजे काय व त्यावरील उपचार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। सातारा । जागतीक क्षयरोग दिनानिमीत्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग. केंद्र व अक्षया प्रकल्प चाय यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. क्षयरोगाची लक्षणे 15 दिवसापेक्षा जास्त काळ असणारा खोकला, वजन कमी होणे, भूक मंदावने रात्रीचा हलकासा ताप येणे व घाम सूटने, इ. प्रामुख्याने लक्षणे आढळल्यास क्षयरोगाची तपासणी जवळच्या सरकारी रुग्णालयात मोफत करुन घ्यावी. तपासणी अंती क्षयरोग झाल्याचे आढळल्यास त्यास संपूर्ण उपचार मोफत केला जातो.
जागतिक क्षयरोग दिन म्हणून 24 मार्च रोजी जगभर साजरा होत आहे. जागतिक स्तरावरुन राबविण्यात येणार्‍या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम चे राज्य व जिल्हास्तरावर देखील क्षयरोग शोध कामाबाबत देखरेख ठेवली जात आहे. क्षयरोग हा सुक्ष्मजंतू मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलॉसिस मुळे होतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो यावेळी क्षयरुग्णाच्या तोंडातून सुक्ष्मथेंब ) बाहेर पडतात व या सुक्ष्मथेंबामध्ये हे क्षयरोगाचे जंतू असतात. हे सुक्ष्मथेंब हवेत बराच वेळ तरंगत असतात व ज्यावेळी निरोगी व्यक्ति ही हवा नाकाद्वारे आत घेतो. त्यावेळी प्रवासातुन क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्तिच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो.
क्षयरोगाचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण होते. फुप्फुसाचा क्षयरोग फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग
फुफ्फुसाच्या क्षयरोगाची लक्षणे खालीलप्रमाचे : दोन आठवडयापेक्षा जास्त काळ खोकला, हलकासा परंतु सायंकाळी वाढणारा ताप (हाड्या ताप), भूक मंदावणे, छातीत दुखणे, काही गंभीर क्षयरुग्णांच्या बेडक्यातून रक्त पडते, वजन कमी होणे. तसेच एच. आय. व्ही बाधीत किंवा मधुमेही रुग्णांमध्ये एक दिवसाचा खोकलादेखील क्षयरोगाचा असू शकतो, थुंकीदुषित रुम्वाचा सहबासीत, कुपोषित, वारुचे व्यसन

फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग :- गंडमाळा (लसिका ग्रंथी) मानेवर सुज व गाठी येतात कधीकधी यामधून पू बाहेर येतो मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग क्षयरोगाची लक्षणे आढळतात. (मेनिनजायटीस) डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इत्यादी बात
मणक्याचा क्षयरोग :- क्षयरोगाचे निदान मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्रामध्ये (डीएमसी) बेडका तपासणी करणे हे क्षयरोग तपासणीचे प्रमुख साधन आहे दोन आठवडयांपेक्षा जास्त काळ खोकला असल्यास नजीकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडका नमुना घेण्याची व्यवस्था आहे. (सातारा जिल्हयात 62 ठिकाणी सुक्ष्मदर्शक केंद्र आहेत)
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची उद्दीष्टे पुढील प्रमाणे : 1) नबीन सापडलेला स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णाचे बरे होणेचे प्रमाण 90 पेक्षा जास्त साध्य करणे. 2) अपेक्षित स्पुटम पॉझिटिव्ह रुग्णांपैकी किमान 90% शोधून त्याची नोंद करणे.
क्षयरोग उपचार पध्दत आपले नजिकच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. जर रुग्णास प्रथमच क्षयरोगाची बाधा झाली असेल तर अशा क्षयरुग्णास क्षयरोग उपचार सुरु केला जातो नविन थुकीदुषित, नविन थुंकीअदुषित (एक्स रे दुषित), नबिन फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग इत्यादी क्षयरुग्णांना 6 महिन्यंचा उपचार दिला जातो. या क्षयरुग्णोना प्रत्यक्ष निरिक्षणाखाली उपचार दिला जातो
क्षयरोग व एचआयव्ही :-क्षयरोगाचा उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णांची एचआयव्ही तपासणी करणेत येते क्षयरुग्ण एचआयव्ही बाधित असल्यास त्यास एआरटी सेंटरकडे उपचारासाठी पाठविले जाते व रुग्णास एचआयव्ही व क्षयरोगाची औषधे सुरु ठेवण्यात येते. एचआयव्ही बाधित रुग्णाचा क्षयरोग पुर्ण बरा होतो
क्षयरोग व मधुमेह- क्षयरोगाचा उपचार घेणा-या सर्व क्षयरुग्णाची मधुमेहासाठी तपासणी करणेत येते. क्षयरुग्णास मधुमेह असल्यास त्यास छउऊ सेंटरकडे उपचारासाठी पाठविले जाते व रुग्णास मधुमेह व क्षयरोगाची औषधे सुरु ठेवण्यात येते. मधुमेह बाधित रुग्णाचा क्षयरोग पुर्ण बरा होतो
एम.डी.आर. क्षयरोग (मल्टी ड्रग रेझिस्टंस क्षयरोग) व डॉटस प्लस उपचार. सद्या नव्या प्रकारचा क्षयरोग मनुष्यहानी करणेसाठी उतावीळ आहे तो म्हणजे एम.डी. आर क्षयरोग उपचार सुरु केल्यानंतर बरेचसे क्षयरुग्ण उपचार व्यवस्थित न घेता धरसोड करतात व्यसनाधिन होतात, औषधोपचार पूर्ण व वेळेत न घेतल्यास क्षयरुग्णाच्या शरीरातील जंतु स्तः मध्ये बदल घडवून आणतात व सद्या डॉटस उपचारातील औषधे (फस्ट लाईन अ‍ॅटी ढइ औषधे) या जंतुला मारण्यात नाकाम ठरतात अशा क्षयरोगाला एम.डी.आर. क्षयरोग म्हणतात. या क्षयरुग्णाना पुढे डॉटस प्लस उपचार देणेसाठी सद्या जिल्हयामध्ये अशा क्षयरुग्णांचे शोधकाम सुरु आहे एम.डी. आर. रुग्णांचा शोध हा CBN–T d TRUEN–T मशीनद्वारे तपासणी केल्यानंतर यामध्ये डॉटस प्लसचा उपचार दोन वर्षाचा केला जातो.

क्षयरोगाबाबत खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना अधिसूचना- सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे क्षयरुग्ण बगळता खाजगी वैद्यकिय व्यवसायीक यांचेकडे असणार्‍या क्षयरुग्णांबाबत देखील यापूढे देखरेख रहाणेसाठी केंद्रसरकार मार्फत खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार जे खाजगी वैद्यकिय व्यवसायीक क्षयरोगाचा उपचार करणार आहेत त्यांनी क्षयरुग्णाची यादी जिल्हा क्षयरोग केंद्र सातारा या कार्यालयास देणे बंधनकारक आहे तशी माहीती न दिलेस कलम 269/270 कलम अंतर्गत त्या वैद्यकिय व्यवसायीकावर कारवाई होऊ शकते. यामुळे उपचार घेणार्‍या क्षयरुग्णांची वेळोवेळी देखभाल घेणे सोईचे जाईल.

क्षयरुग्णांनी काय करावे : मुळात क्षयरोग झाला म्हणुन घाबरु नका हा आजार सरकारी दवाखान्यात 6 ते 9 महिन्यांच्या उपचाराने बरा होतो.
हा उपचार पुर्ण मोफत उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णासाठी 6 ते 9 महिनेंचे पुर्ण बॉक्स एकदाच तयार करुन ठेवलेले असते त्या मुळे औषधोपचार अखंडीत सुरु राहतो. खोकताना किंवा शिंकताना तोडाबर आठवणीने रुमाल धरावा. इतरत्र कोठेही थुंकु नये. त्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. सुरु असणारा औषधोपचार पूर्ण करा, मध्येच धरसोड केल्यामुळे जंतु औषधांना दाद देत नाही हि बाब लक्षात ठेवा.
(संकलन – जिल्हा माहिती कार्यालय सातारा )


Back to top button
Don`t copy text!