राज्यात चाललंय काय? केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची यात्रेत छेडछाड; पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२५ | जळगाव |
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्र्यांच्याच मुलीची छेडछाड होत असेल तर राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावाची यात्रा बघण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुण त्यांच्या परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही तरुणांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट झाल्याची माहिती मिळत आहे.

छेडखानी करणार्‍यांना अटक करा, रक्षा खडसे आक्रमक

छेडखानी करणार्‍या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. छेडखानी करणार्‍या मुलांना लवकरात लवकर अटक करा, या मागणीसाठी रक्षा खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्या सोबत मंत्री रक्षा खडसे चर्चा करत आहेत. या तरुणांना अटक झालीच पाहिजे. माझं एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला.

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल राज्यात तर सर्वसामान्यांच्या मुलींबाबत सरकारचं नेमकं धोरण काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!