दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथे आलेल्या कृषीकन्या शिंदे तेजस्विनी, आवारे ऋतुजा, पवार ऋतुजा, मांजरे महेश्वरी, रणवरे ऋतुजा, व्यवहारे प्राची, शिंदे स्नेहल यांचे सरपंच सौ. पल्लवी पवार, कृषी सहाय्यक सचिन जाधव, तलाठी ए.जी.कुदळे, ग्रामसेवक प्रशांत रणपिसे व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत डाळिंब व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. सर्व कृषीकन्यांनी सरपंच सौ.पल्लवी पवार यांना भेटून गावाविषयी माहिती मिळवली.
गावातील समस्यांविषयी चर्चा केली तसेच गावातील रब्बी पिकांविषयी माहिती मिळवली.
या अडीच महिन्यांच्या कालावधीत कृषीकन्या शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड, रोग व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, शेतातील अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी बाबत गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेतीविषयी जनजागृती करणार आहेत.
यावेळी सरपंच सौ. पल्लवी पवार, कृषी सहाय्यक सचिन जाधव, तलाठी ए.जी कुदळे, ग्रामसेवक प्रशांत रणपिसे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व कृषीकन्यांना प्राचार्य डॉ.एस. डी.निंबाळकर, प्रा.एन.एस ढालपे, प्रा.एस.वाय लाळगे, प्रा.एन.ए.पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.