फलटणच्या कृषिकन्यांचे वाठार निंबाळकर येथे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 28 नोव्हेंबर 2024 । फलटण । वाठार निंबाळकर ता.फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

दहा आठवडे चालणार्‍या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकर्‍यांना दाखवली जाणार आहेत.

वाठार निंबाळकर येथील ग्रामपंचायतीला कृषी कन्यांनी भेट दिली, त्यावेळी वाठार निंबाळकर गावचे उपसरपंच अमृत निंबाळकर, तलाठी आकाश डोमसे, कृषी साहाय्य्क अधिकारी राहुल कांबळे, सर्कल मंडळ अधिकारी महेंद्र देवकाते, कोतवाल कविता जगताप व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.

यादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये वास्तव्य करून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी, त्यांचा जीवनमान,सामाजिक व आर्थिक स्तर संबंधित गावातील पीक पद्धती अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती आधारित उद्योग व्यवसाय व इतर हवामानाविषयी जास्तीत जास्त माहिती विविध ऍपद्वारे कशी संपादित करता येईल याबाबत कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या राधिका शिंदे, ऐश्वर्या शिंदे, सानिका झांजुर्णे, मानसी महाडिक, वैष्णवी रणवरे, ज्ञानेश्वरी धायगुडे या शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांमध्ये शेवटच्या चार आठवड्यात कृषी कन्या कृषी आधारित उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु. डी.चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा.नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभणार आहे.

ग्रामीण कृषी कार्यानुभव  कार्यक्रमांतर्गत या कृषी कन्या या गावात राहून शेतकर्‍यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!