खा. शरद पवार यांचे फलटण येथे स्वागत


स्थैर्य, फलटण दि. २४ : येथील एका विवाह समारंभाच्या निमित्ताने खा. शरद पवार यांचे हेलीकॉप्टरने येथील विमानतळावर दुपारी आगमन झाले, विवाह समारंभानंतर खा. पवार त्याच हेलीकॉप्टरने येथून मुंबईस रवाना झाले.

विमानतळावर आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर तिघेही त्यांच्या समवेत विवाह समारंभास उपस्थित राहिले.

विवाह समारंभ स्थळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी खा. पवार यांची भेट घेतली.


Back to top button
Don`t copy text!