हैबतबाबाच्या जन्मभुमीत फुलाची उधळण व हरी नामाचा गजर करत माऊलीचे केले स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०१ : फुलाची उधळण व हरी नामाचा गजर करत माऊलीचे स्वागत केले,  आळंदीहुन विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकऱ्याशिवाय एसटी बसने पंढरपुरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाने सोमवारी ४ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जनक असणाऱ्या हैबतबाबाच्या जन्मभुमीत सातारा जिल्हयात प्रवेश केला. माऊलीच्या पादुका असणाऱ्या एसटी बसने सातारा जिल्हयाच्या ऐतिहासिक भुमीत प्रवेश केल्यावर माऊलीचे जंगी जिल्हा स्वागत होणाऱ्या पाडेगाव टोलनाका परिसरात शुकशुकाट होता मात्र लोणंद येथे मोजक्या भाविकानी व वारकऱ्यानी फुलाची उधळण व हरी नामाचा गजर करत माऊलीचे स्वागत केले.

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पायी वारीने पंढरपुरला न नेता मोजक्या वारकऱ्याच्या उपस्थितीमधे नेणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, त्यामुळे मंगळवारी सकाळी आकर्षिक फुलानी सजवलेल्या एसटी बसने कडक पोलीस बदोबस्तात माऊली पंढरपुरकडे मार्गस्थ झाली, हा सोहळा कोठेही न थांबता पंढरपुरच्या दिशेने जात आहे,माऊलीचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यावर लोणंद येथील अहिल्यादेवी चौकामधे मोजक्या भाविकानी व वारकऱ्यानी फुलाची उधळण व टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाचा गजर करत माऊलीचे स्वागत केले, त्यानंतर माऊली सोहळा चांदोबाचा लिंब येथे विसावला होता थोडावेळ माऊली सोहळा चांदोबाचा लिंब येथून पुढे मार्गस्थ झाला. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!