दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी चे वर्ग शासन आदेशा प्रमाणे 4 ऑक्टोबर पासून प्रत्यक्षात सुरू झाले. ऑफलाइन शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेचे प्राचार्य संदीप किसवे व शिक्षकांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी संदीप किसवे यांनी विद्यार्थ्यांना कोविडच्या नियमांचे पालन करून स्वतः सुरक्षित राहून इतरांना कसे सुरक्षित ठेवाल यासंबंधी मार्गदर्शन केले. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा मागील शैक्षणिक वर्षात जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष सुरू झाल्या होत्या. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा बंद झालेल्या शाळा आता सुरू झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अजूनही पूर्णपणे कमी न झाल्यामुळे सर्व नियम व अटी पाळून शाळेत अध्ययन अध्यापनाचे काम चालू आहे. शाळेत सध्या नर्सरी ते चौथीपर्यंतच्या वर्गांचे ऑनलाइन पद्धतीने व पाचवीपासून पुढील वर्गाचे ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू आहेत.
संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे व अध्यक्ष ईश्वर गावडे यांनी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक पाचवी ते बारावी चे विद्यार्थी व पालक कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.