स्थैर्य, सातारा, दि.२७ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न कार्यायासाठी एकदा तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजवणाऱ्या बॅंन्ड पथक, बँन्जो पार्टी यांना वेगळी मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाउन पुकारण्यात आला. लॉकडाउन अंशत: शिथिल करत त्यासाठीची नियमावली केंद्र व राज्य शासनाने जारी केली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर मर्यादित उपस्थितीच्या निकषावर लग्न व इतर धार्मिक विधी सुरू झाले. हे विधी सुरू करतानाच लग्नावेळी बॅंड वादनास परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे बॅंड पथकातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. आठ महिने हातावर हात धरून बसलेल्या बॅंड व्यावसायिकांनी, तसेच कलाकारांनी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, बॅंड व्यावसायिकांचा प्रश्न निकाली निघाला नाही. लॉकडाउनच्या काळातील लग्नसराईचा हंगाम न झाल्याने बॅंड व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले.
अर्णबच्या जामीनावर सर्वोच्च न्यायालय:महाराष्ट्र पोलिसांच्या FIR मधून आरोप सिद्ध होत नाही
दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गामुळे लग्न कार्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे करणे बंधनकार असून या नियमानुसार लग्न कार्यास घातलेल्या मर्यादेतच नागरिक उपस्थित राहू शकतात. लग्न कार्यासाठी तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजविणाऱ्या बॅन्ड पथक, बँन्जो पार्टीसाठी वेगळ्या अशा कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.