दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । फलटण । श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना फलटण येथे मुक्कामी होता. फलटण येथे मुक्कामी असताना श्रीमंत अनिकेतराजे गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पालखीमधील वारकऱ्यांना मोफत नाश्ता म्हणजेच पोह्याचे वाटप करण्यात आले.
फलटण शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष व श्रीमंत अनिकेतराजे महागणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चि. गौरव नष्टे यांनी महात्मा फुले चौक येथे आयोजन केले होते.