बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लातूर दि.23 : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अर्थात एमसीआयकडे आग्रह धरू, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान परिषदने अलीकडेच दिल्या होत्या मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अध्यापकांना तसेच कर्मचाऱ्यांसाठी हजेरीपटाद्वारे हजेरी घेणेच सुरक्षित असल्याने बायोमेट्रिक पद्धत तातडीने बंद करावी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी लवकरच फेसरीडर बसविण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.

बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो हे लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने आदेश काढून बायोमेट्रिक हजेरी बंद केली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातही ही पद्धत वापरणे योग्य ठरणार नाही, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!