कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सुद्धा आपण रिलॅक्स होऊन चालणार नाही : आमदार चंद्रकांतदादा पाटील; फलटण येथे लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १२ : कोरोनाच्या दुसरी लाट हि इतकी भयंकर असेल असे कोणालाही वाटले नव्हते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टर व कोरोना केअर सेंटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत आहे. पहिली लाट गेल्यानंतर लसीकरण सुरु झाले परंतु लसीकरणासाठी सर्वच नागरिकांनी पाठ फिरवली. मोठ्या प्रमाणावर लसीकरण न झाल्याने दुसरी लाट प्रचंड वेगाने आली. ह्या लाटेमध्ये अन्नधान्य व इतर आवश्यकता कमी आहे. ह्या पेक्षा कोरोना केअर सेंटर काढणे सुरु करणे गरजेचे आहे. ह्या मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक खासदार व आमदार यांनी एक कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास सांगितले. आताच्या लाटेमध्ये विलीगीकरण व अलगीकरण सुरु करणे गरजेचे होते व तसाच मी आग्रह धरला. पक्षाचा आदेश मानून आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना केअर सेंटर सुरु केले. आता हि लाट ओसरल्यानंतर सुद्धा आपण रिलॅक्स होऊन चालणार नाही. कुठलाही आजार कधीही संपत नाही. आपल्या देशाने पोलिओ या आजरावर मात केली. ह्या प्रमाणेच डेंग्यू, मलेरिया व इतर आजार गेले असे झालेले नाही व कोरोनाच्या बाबतीत सुद्धा कोरोना गेला असा होणार नाही. आता उभे करत असलेलो कोरोना केअर सेंटर हे काही दिवसांनी ओस पडली तरी ते बंद करून चालणार नाही. दुसरी लाट गेल्यावर तिसरी लाट येणार नाही, असे कोणालाही सांगता येणार नाही. फलटण सारख्या ठिकाणी रोज सुमारे ५०० रुग्ण सापडत आहेत. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळणे गरजचे आहे. एक संघर्षशील नेता अशी ओळख माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर होती. आयुष मंत्रालयाने निर्गमित केलेल्या नवनवीन उपचार हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी आपण कार्यरत राहावे. जे उपचार नातेवाईकांना देणार तेच उपचार मतदारसंघातील नागरिकांना द्याव्यात, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर या सेंटरचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदार समीर यादव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, मनोज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर आपण सुरु करत आहोत. ह्या सेंटरला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. आता आपण लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करत आहोत त्याचे मूळ कारण म्हणजे फलटण तालुक्यामध्ये रोज सुमारे ४०० रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. त्या मुळे आपल्याला लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करणे गरजेचे झालेले होते. म्हणूनच सुरु करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हि कार्यरत आहेत. माढा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही दिलेली आहेत. आता येणाऱ्या रमजान ईद या सणानिमित्त माढा मतदारसंघातील असणाऱ्या प्रमुख शहरांमध्ये दुधाचे वाटप करणार आहोत. मागील वर्षी भाजीपाला व किराणा किट्सचे वाटप आपण केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे कायम सर्व कार्याचा आढावा घेवून मार्गदर्शन करत होते. सर्वानी एकत्रीत येऊन जर आपण काम केले तर आणि तरच आपण कोरोनाला हद्दपार करू, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्ना मुळे लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु होत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरु केलेले आहेत व आगामी काळात सुद्धा सुरु होत आहेत. गेल्या चौदा महिन्यापासून आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. नेमके कोरोनाचे संकट किती दिवस राहणार आहे, हे आपल्याला माहित नाही. सरकारी व खाजगी रुग्णालये आता कमी पडत आहेत. गरीब माणूस खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाही. या मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी हे कायम जनतेसोबत राहत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. लसीकरण करताना शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन लस घेऊन जातात. राज्य सरकारच्या निष्काळजी पणा मुळे लसीकरणामध्ये अनेक त्रुटी शिल्लक आहेत. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. ह्या मध्ये राज्य सरकारने त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने कोरोनाच्या विरोधात लढा देत आहेत, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

सध्या फलटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. अजूनही रोज सुमारे ३०० रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. सरकारी व खाजगी असे एकूण मिळून ९ हॉस्पिटल कार्यरत असून सुद्धा सध्या बेड्ससाठी वाट बघत बसावी लागत आहे. परंतु लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर ह्या सेंटर मुळे फलटण तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असे मत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी व्यक्त केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. फलटण तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. रोज सुमारे ४०० कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. प्रत्येक दवाखान्यात वेटिंग आहे. सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पहिले लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर हे सेंटर सुरु केलेले आहे. त्या मुळे आज हे ५० ऑक्सिजन बेड्स व ५० आयसोलेशन बेड्सचे आज येथे सुरु आहेत. फलटण मधील प्रशासकीय अधिकारी यांची मोलाची मदत फलटणकरांना होत आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी या वेळी दिली.

प्रास्ताविक अमोल सस्ते यांनी केले तर आभारात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फलटण शहरात सुरु असणाऱ्या कामकाजाची माहिती नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली. राष्टीय परिचारिका दिनानिमित्त फलटण तालुक्यातील परिचारिकांचा सन्मान जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!