शेतकर्‍यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार..होनमाने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. ३० : परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडातून हिसकावला आहे. यामुळे माण तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकर्‍यांना सावरण्यासाठी शासनाने सरसकट 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रासपच्या पदाधिकार्‍यांनी दहिवडी येथे तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली.

अतिवृष्टीमुळे शेतातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बटाटा, सोयाबीन, मूग, बाजरी या पिकांसोबत कांदा, टोमॅटो व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. ऊस, डाळींब, द्राक्ष यांचीही मोठी हानी झाली. बोथे या गावामध्ये बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पंचनामे करून सरसकट 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दहिवडी येथे तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष मामू वीरकर, बबन वीरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य, माण-खटाव विधानसभा अध्यक्ष प्रा. सचिन होनमाने, रासपचे कायदे सल्लागार अ‍ॅड. विलास चव्हाण, माण तालुका अध्यक्ष दादासाहेब दोरगे, महिला अध्यक्षा सौ. बनसोडे, महिला अघाडी सौ. नरबट, अकाश वीरकर, बरकडे, शिवाय बरकटे, दादासाहेब माळवदे, दादासाहेब डोंबाळे व रासपचे पदाधिकारी उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!