कोव्हिडच्या भीषण आठवणी मनाच्या कोपऱ्यात ढकलून पुढील आवाहने स्वीकारण्यास सज्ज राहू : श्रीमंत रामराजे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑक्टोबर 2021 | फलटण | गेली जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ आपण कोरोना म्हणजेच कोव्हिडं या आजाराशी सामना करीत आहोत. तरी पूर्वीच्या सर्व कोव्हिडच्या आठवणी मनाच्या कोपर्‍यामध्ये ढकलून पुढील आव्हाने स्वीकारण्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहू, याच दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देतो, अशा शुभेच्छा विजयादशमीच्या निमित्ताने विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाटस्अ‍ॅप स्टेटसद्वारे सर्वांना दिलेल्या आहेत.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा दसरा आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील कोरोनाचं संकट लवकर दूर होवो व कोव्हीडच्या सर्व भीषण आठवणी मनाच्या कोपऱ्यात ढकलून पुढील आव्हाने स्वीकारण्यास सज्ज राहूया, अशा  शुभेच्छा विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रवासियांना दिल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!