
दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी फलटण येथील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल सेलिब्रेशन रूफ टॉप रेस्टॉरंट या प्युअर व्हेज रेस्टॉरंटला सदिच्छा भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेतला. फलटणमधील खवय्यांसाठी हॉटेल सेलिब्रेशन एक पर्वणीच असल्याचे मत सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी हॉटेल सेलिब्रेशन मध्ये उत्कृष्ट प्रकारचे प्युअर व्हेज जेवण मिळत असून हॉटेलच्या परिसराबद्दल व ॲम्बीयन्सचे विशेष कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी केले.
हॉटेल सेलिब्रेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला आहे.
फलटण येथील हॉटेल सेलिब्रेशन रूफ टॉप प्युअर व्हेज रेस्टॉरंट हे गत काही महिन्यांपूर्वी सुरू झाले असून फलटणकरांच्या पसंतीस उतरलेले हॉटेल म्हणून हॉटेल सेलिब्रेशनला अनेक फलटणकरांनी मान्यता दिली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सुद्धा हॉटेल सेलिब्रेशनच्या जेवणाचा आस्वाद घेत हॉटेलबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

