आम्ही कधी कोणाची घरे फोडली नाही; उदयनराजे यांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सडकून टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । सातारा । आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत, असं म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. ज्या लोकांनी स्वताः च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकात ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळं केल नाही, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर उदयनराजेंनी सडकून टीका केली.

कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि धरणाचे पाणी सोडण्याच्या स्वयंचलित गेटचे पूजन प्रसंगी ते बोलत होते.

खासदार उदयनराजे म्हणाले, काही काम झालं की आम्ही केलं म्हटले जाते. वय वाढल पण यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी होत गेलेली आहे. नारळफोडी गॅंग हो आम्हांला सार्थ अभिमान आहे. आम्ही काम करतोय, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाणे मी कमी समजतो. परंतु दिशाहीन झालेले अत्यंत सकुंचित वृत्तीची काही लोक असतात त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे हे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे असते.


Back to top button
Don`t copy text!