आमचंही ठरलंय… माढा – करमाळ्यातून दोन लाखांचे मताधिक्क्य नाईक-निंबाळकर खासदारांना द्यायचंय : आ. बबनदादा शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२३ | फलटण | नाईक-निंबाळकर खासदारांनी गेल्या चार वर्षात विकासकामांबाबत आमच्याबरोबर कायमच सहकार्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे आमचंही ठरलंय… माढा – करमाळ्यातून दोन लाखांचे मताधिक्क्य नाईक-निंबाळकर खासदारांना द्यायचंय, असे प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.

श्रीपूर (ता. माळशिरस) येथे आज श्रीपूर ते खंडाळी रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत ७ कि.मी. डांबरीकरण झालेल्या या रस्त्याचा एकूण खर्च ५१०.३९ लक्ष आहे. यावेळी आमदार शिंदे बोलत होते.

या लोकार्पण समारंभप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळक़र, आमदार बबनदादा शिंदे, माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन श्री. रंजनभाऊ गिरमे, श्री. रणजितभैय्या शिंदे, श्री. उत्तमराव जानकर, श्री. राजकुमार पाटील, माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, नगराध्यक्षा सौ. चव्हाण, श्री. अशोकराव चव्हाण तसेच म्हाळुंग नगरपंचायतीचे नगरसेवक व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

आ. बबनदादा शिंदे म्हणाले की, ज्या खासदारांचा चार वर्षात आम्हाला कोणताही त्रास नाही, उलट झाली तर मदतच झाली असल्यामुळे व विकासकामांबाबत त्यांचे कायम सहकार्याचे धोरण असल्यामुळे अशा खासदारांना मागील मताधिक्क्यापेक्षा अधिक म्हणजेच माढा-करमाळा या दोन तालुक्यांतून दोन लाखांचे लिड देऊ. याबरोबरच खासदारांनी व त्यांनी स्वतः या माळशिरस तालुक्यातील १४ गावात केलेल्या विकासकामांची यादी मांडली. तसेच केंद्र असो किंवा राज्य असो, यमाई मंदिर जीर्णोद्धारास एक रुपयाही कमी पडून देणार नाही, असा शब्द दिला असल्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!