आम्ही खासदार शरद पवार साहेबांच्यासोबत : जेष्ठ नेते सुभाष शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण | सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथ झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विविध घटना घडल्यानंतर आता स्थानिक पातळीवर माजी केंद्रीय केंद्रीय कृषी मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यामुळेच आम्ही पवार कुटुंबियांवर प्रेम केले आहे. आता आगामी काळामध्ये आमचे नेते खासदार शरद पवार यांच्यासोबतच आम्ही कायम राहणार आहे; असे मत शरद पवार यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

आज दैनिक स्थैर्यशी फलटण येथे बोलताना जेष्ठ नेते सुभाष शिंदे बोलत होते.

माझे आई, वडील व बायको गेल्यावर जे दुःख झाले आहे; तेवढेच दुःख मला पवार कुटुंबियांच्यात फूट पडल्यावर झाले आहे. आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्ताच्या मनाला अतोनात वेदना पोहचल्या आहेत. आम्ही पहिल्यापासून खासदार शरद पवार यांच्यासोबतच होतो व त्यामुळेच आगामी काळामध्ये सुद्धा आपण खासदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे; असे ही यावेळी जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!