दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील शेतकरी विक्रम जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून ते लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतकरी विक्रम जाधव यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने गटारीचे पाणी सोडले आहे यामध्ये या गटाराची पाईप फुटल्याने या रस्त्यावर मोठया प्रमाणावर दुर्गंधी व गटाराचे पाणी पसरल्याने जाधव कुटुंबीय मोठ्या हाल अपेष्टा सोसत आहेत काही दिवसांपूर्वी शेतकरी विक्रम जाधव यांनी माजी सरपंच ऋषीभैय्या जाधव व विद्यमान सरपंच नीता माने यांचे पती संजय माने यांच्याकडे तक्रार केली होती परंतू यांनी कोणतेच ठोस असे पाऊल उचलले नाही व पाईप लिकेज काढले नाही त्यामुळे आम्हा सर्व जाधव कुटुंबाला या गटारातून जावे लागत आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी तक्रार करून सुद्धा कोणतेच पाऊल उचलले नसल्याने मी येत्या १५ दिवसात तीव्र असे आंदोलन ग्रामपंचायतीच्या विरोधात करणार असल्याचे शेतकरी विक्रम जाधव यांनी सांगितले. व वाठार स्टेशन ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असलेला खेळ त्वरित थांबवावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असेही जाधव पुढे म्हणाले.