दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहरातील सोमवार पेठ येथील कॅनॉलवरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली मुख्य जलवाहिनी स्थलांतर करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे फलटण शहरातील खजिना हौद या ठिकाणाहून शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, रविवार, पांचबत्ती चौक, पेठ लक्ष्मीनगर, शिवाजीनगर, विद्यानगर, भडकमकरनगर, स्वामी विवेकानंदनगर, संत बापूदास नगर, हनुमाननगर, बारस्कर गल्ली, मारवाड पेठ इ. भागामध्ये दि. ८.१०.२०२४ (मंगळवार) व दि. ९.१०.२०२४ (बुधवार) रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागातील नागरिकांनी पाणीवापर काटकसरीने करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी केले आहे.