शाश्वत पाण्यासाठी सातार्‍यात 8 ते 22 मार्चअखेर जलमहोत्सव


स्थैर्य, 7 मार्च, सातारा : महाराष्ट्रातील ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात 8 ते 22 मार्चअखेर जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले आहे.

महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील गावोगावी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नाही, तर ती सांस्कृतिक पद्धती म्हणून पाण्याची जपणूक करावी.

पाण्याच्या संवर्धानासाठी स्थानिक  परंपरा यांचा उपयोग मुख्यतः विचारात घेण्यात येणार आहेत. गावागावांत पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे, फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात युवकांचा जलसंवर्धनासाठी सहभाग घेण्यासाठी यंग बिग्रेडची स्थापना, जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

ग्रामपंचायत आराखड्यात संवर्धनासाठी विकास पाण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी 8 ते 22 मार्च जलमहोत्सव राबवला जाईल, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी प्रज्ञा माने यांनी दिली.

गाव, पंचायत समितीस्तरावर लोकजल उत्सव आयोजित केला जाईल. जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असणार आहे. पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे स्थानिक जलउत्सव संस्थात्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरुस्तीसाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे तसेच आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!