जलसंधारणाची कामे वाढवणार – युगेंद्रदादा पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२४ | फलटण |
शरयु फौंडेशन व शरयु साखर कारखान्याच्या वतीने जलसंधारण पाणलोट व रस्ते विकासाची भरीव कामे करून परिसराचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन शरयु शुगरचे कार्यकारी संचालक श्री. युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे.

बिबी येथे फौंडेशनने ओढा खोलीकरण कामासाठी मोफत पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले असून सदर कामाची पाहणी करण्यासाठी आज बिबी येथे त्यांनी भेट दिली.

यावेळी युगेंद्रदादा म्हणाले की, शरयुच्या माध्यमातूम याआधी विद्यार्थ्यांची गैरसोय ओळखून माध्यमिक शाळेसाठी सहा नवीन वर्गखोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घाडगेवाडी ग्रामपंचायतीस जलजीवन योजनेसाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी भरीव मदत करण्यात आली असून तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. परिसराचा शाश्वत विकास आणि शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती यासाठी शरयु कायम प्रयत्नशील राहणार असून जलसंधारण पाणलोट विकास, शेती सुधारणा, ऊस विकास, रस्ते दुरूस्ती व सुधारणा आदी कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत.

शिवजयंतीचे औचित्य साधून प्रारंभी श्री. युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बिबी ग्रामस्थांच्या वतीने श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच सौ. रूपाली बोबडे, शरयुचे संचालक श्री. अविनाश भापकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रीती काशीद, विकास सोसायटीचे चेअरमन बळवंत नलवडे, नंदकुमार कुंभार, सूर्यकांत निंबाळकर, संदीप काशीद, तुळशीदास बोबडे, डॉ. बापू बोबडे, संजय बोबडे, अनिल बोबडे, आदेश बोबडे, अनिल गायकवाड, उदयसिंह बोबडे, लक्ष्मण बोबडे, विनोद बोबडे, प्रदीप बोबडे, जुबेर शेख, सुशील बोबडे, सिकंदर दीक्षित, वैभव कुंभार, विशाल पवार, आदींसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!