
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑक्टोबर 2021 | फलटण | वीर धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदी पात्रामध्ये आज दुपारी दोन वाजता चार हजार 637 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार वीर धरणांमधून नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तरी नीरा नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
