दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
महात्मा गांधी, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्त व समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत, तरीसुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही. त्यांनी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच इतर महापुरूषांबाबत तसेच विविध संत, महात्मे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी, अन्यथा मोठे जनअंदोलन उभारले जाईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनाच्या वतीने याबाबतचे निवेदन फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी मनोहर भिडे यांनी अनेकवेळा समाजात तेढ निर्माण होईल, अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने पुन्हा ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तरी त्यांच्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, तुकाराम गायकवाड, बाळासाहेब ननावरे, शरदराव कोल्हे, बापूराव शिंदे, गोविंदराव भुजबळ, विजय शिंदे, रणजित भुजबळ, विकास शिंदे, दत्ता नाळे, सुभाष अभंग, नंदकुमार कचरे, अशोक शिंदे, शनैश शिंदे, प्रशांत शिंदे, माधव जमदाडे, तुजुद्दीन बागवान, अमीर शेख, शेखर क्षीरसागर, नितेश भुजबळ, जालिंदर राऊत, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश अडसूळ, योगेश भुजबळ, प्रवीण फरांदे, अमोल शिंदे, प्रताप नाळे, स्वप्निल शिंदे, तुषार कर्णे, तुळशीराम शिंदे, तुषार नाळे, रोहन शिंदे, योगेश शिंदे, अमोल शिंदे, सनी रायकर, सचिन अभंग, शिवराज नाळे, किरण अब्दागिरे, शुभम जाधव, तोशिफ आतार, अमोल मिसाळ, प्रशांत नाळे, गिरीश बनकर, प्रशांत ढावरे तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.