स्थैर्य, बिजवडी, दि. 30 : वारकरी संप्रदायातील लोकांना अक्षयवारी हे नाव नवीन नाही. वर्षभर वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रभरातील कीर्तन, प्रवचन यांचा लाभ सर्वांना व्हॉट्सअॅप फेसबुकच्या माध्यमातून हे पोर्टल उपलब्ध करून देत असते. अक्षयवारी हे पेज वारीचा अनुभव आपणास घरबसल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे की कोणतीही दिंडी किंवा व्यक्ती पंढरपूरला पायी चालत जाणार नाही. वारीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी केवळ संतांच्या चरण पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे पंढरपूरला नवमी दिवशी पोहचतील. वारकरी संप्रदायातील सर्वच मंडळींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. वारी संदर्भातील शासनाच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे. घरबसल्या वारीचा अनुभव देण्यासाठी आम्ही अक्षयवारी या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल वारी भविकांपर्यंत घेऊन येत आहोत. आपल्या स्मार्ट फोनद्वारे आपण या वारीत घरबसल्या सहभागी होवू शकता. यासाठी तुम्ही 8451822772 या व्हॉटसअॅप नंबरवरती मेसेज कॉल करून डिजिटल पोर्टलमध्ये सहभागी होवू शकता.