स्थैर्य, फलटण दि.२७ : भारतीय जनता पक्ष अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार फलटण शहरातील प्रभा क्रमांक 10 मधील नागरिकांना घरोघरी वाफारा मशीनचे वाटप करणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप शहा यांनी दिली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात वाफारा मशीनचा वापर महत्त्वपूर्ण असल्याने नागरिकांना हे मशीन उपयुक्त ठरेल, असा विश्वासही अनुप शहा यांनी व्यक्त केला.