फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमधील वॉर्ड बॉयला अटक; करत होता रेमडीसीव्हर काळाबाजार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०९ : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले. हा वॉर्ड बॉय रेमिडिसवरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. यापुढे असा कोणी रेमिडिसवर औषधाचा काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना बातमी मिळाली कि, सुनिल विजय कचरे हा सुविधा हॉस्पीटल जवळ स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कोविड १९ विषाणुच्या आजारावर लागणाऱ्या रेमडीसीव्हर इंजेक्शन सातारा जिल्ह्यात प्रादुर्भाव रोखण्या करीता लॉकडाऊन घोषीत असताना ती औषधे त्यावरील छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने विक्री करून त्या औषधाचा काळा बाजार करीत होता. अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक अरूण सखाराम गोडसे यांना बोलावून घेवून त्यांना सदर बातमीचा आशय कळवून त्यानुसार पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांना बनावट गिर्हाईक म्हणून काम पाहणारे यांना समक्ष रेमडीसीव्हर या इंजेक्शनची अधिक किमतीने विक्री करणाऱ्या इसमांचा बनावट गिर्हाईक यांना रेमडीसीव्हर या इंजेक्शनची १ बाटली असल्याचे सांगून प्रत्येक बाटलीस रुपये पस्तीस हजार या प्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी बनावट गिर्हाईक यांनी त्यांचे कडून १ इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दर्शविला. फोनवर बोलणाऱ्या समोरील इममाने मगर हॉस्पीटलचे पाठीमागे लक्ष्मीनगर फलटण येथे लवकरात लवकर येण्यास सांगितले त्याप्रमाणे उपस्थित औषध निरीक्षक अरूण सखाराम गोडसे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस.डी.सुळ, एन.डी.चतुरे, व्ही. के. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप हे सदर ठिकाणी रवाना होवून सापळा लावून थांबले.

तसेच बोगस गिर्हाईक पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांनी त्यांचे मोबाईल वरून विक्री करणारे इसमांचे मोबाईल वर कॉल केला असता त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकल वर बसलेलो आहे, असे सांगितले. त्या प्रमाणे खाजगी गाडीवर जावून मोटार सायकल जवळ जावून त्या इसमांशी बोलला व रेमडीसीव्हर इंजेक्शनच्या एका व्हायलची किंमत किती लागेल असे विचारले असता त्या इसमाने किंमत रुपये पस्तीस हजार लागतील असे सांगून विकत असताना त्यांचे मोबाईलची टॉर्च चालू केली असता पोलीस पथक व पंच, औषध निरीक्षक यांनी छापा टाकला असता रेमडीसीव्हर इंजेक्शन विक्री करणारा इसम पळून जात असताना त्यास जागीच गराडा घालून पकडून ताब्यात घेतले.

सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, एस. एन. भोईटे, व्ही. पी. ठाकूर, एस. डी. सुळ, एन. डी. चतुरे, न्ही. एच. लावंड, ए. एस. जगताप यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!